Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home / Legal / वारस दाखला कसा काढावा ?
Q.

वारस दाखला कसा काढावा ?

view 6180Views

1 Year

Comment

1 Answers

Send
1 2023-03-15T13:27:26+00:00

प्रॉपर्टीच्या संदर्भात हक्क सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे सादर करावे लागतात. त्यांपैकीच एक महत्वाचं दस्तऐवज म्हणजे ‘वारस दाखला’ होय. या दाखल्यामुळे संबंधित अर्जदार व्यक्ति ‘वारस अधिकार’ मिळवण्यास पात्र असल्याचे ज्ञात होते. आता हा वारस दाखला कसा काढावा व त्याच्या अटी काय आहेत, हे जाणून घेऊया.        

                                                                   

मरण पावलेल्या व्यक्तीचे हक्क त्याच्यानंतर त्याच्या वारसदारांकडे हस्तांतरित होते. त्यामध्ये संपत्ती, विमा पॉलिसी लाभ, पगार थकबाकी, नोकरी, शेअर्स, कर विवरणपत्र आदींवरील हक्कांचा समावेश होतो. पण, त्यासाठी वारसांना वारस दाखला अर्थात कायदेशीर वारस प्रमाणपत्रासाठी अर्ज द्यावे लागते. मरण पावलेल्या व्यक्तीने मृत्यूपत्र बनवले नसल्यास या प्रमाणपत्राची गरज भासते. मयत व्यक्तीचा ताबडतोब मृत्यूदाखला काढावा लागतो. या प्रक्रियेत कायदेशीर अधिकारी बारकाईने चौकशी करतात. सादर केलेल्या सगळ्या दस्तऐवजांची योग्य पडताळणी होते. कसल्याही प्रकारची त्रुटि न आढळल्यास कायदेशीर रीतीने वारस दाखला प्रमाणित केला जातो.    

प्रॉपर्टी संदर्भातील कायदेशीर कामांत तुम्ही नो ब्रोकरच्या प्रोफेशनल लीगल सर्विसशी संपर्क साधू शकता

                                                               

                                            

कायदेशीर वारस प्रमाणपत्र अर्ज  

तुम्ही नगरपालिका/तालुक्याच्या कार्यालयात जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या दाखल्यासाठी अर्ज करू शकता. मयत व्यक्तीचा जोडीदार, त्याची अपत्ये, भावंडे व त्याचे पालक असे सर्व हयात असलेले मान्यताप्राप्त वारसदार अर्ज करण्यास पात्र असतात. कायदेशीर वारस प्रमाणपत्रासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खाली नमूद केल्याप्रमाणे,

  •  

    व्यवस्थित वैध माहितीनिशी भरलेला अर्ज

  •  

    अर्जदारांचे ओळखपत्र उदा; आधार कार्ड, पॅन

    कार्ड 

  •  पत्त्याचा पुरावा देणाऱ्या अधिकृत प्रती उदा; रेशन कार्ड, लाइट बिल  

  •  

    सर्व मान्यताप्राप्त वारसांच्या जन्मतारखांचा पुरावा

  •  

    अर्जदारांचे फोटो

  •  अर्जदाराच्या स्वाक्षरीसह स्व-घोषणापत्र किंवा शपथपत्र

  •  मयत व्यक्तीचा मृत्यूदाखला

  •  

    मयत व्यक्तिच्या पत्त्याचा अधिकृत पुरावा

या संपूर्ण प्रक्रियेसाठी साधारण ३० दिवसांचा कालावधी लागू शकतो. हा अर्ज करण्याकरीता नाममात्र शुल्क आकारले जाते. कायदेशीर वारस प्रमाणपत्र मयत व्यक्ति व अर्जदार दोहोंमधील वारससंबंध सांगते. प्रॉपर्टी हक्काच्या अंमलबजावणीसाठी हे प्रमाणपत्र अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे अर्ज करताना सर्व औपचारिक अटींची पूर्तता झाल्याची खात्री करून घ्यावी.

संबंधित विषय :

घराची वारस नोंद कशी करावी ? जुने फेरफार कसे काढावे ?  

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners