कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना विशेष पूजा केली जाते. एखादी नवीन वस्तू वापरण्याआधी काही औपचारिक विधी केले जातात, हे सगळं करण्यामागे नक्कीच काहीतरी शास्त्र असतं. त्याचप्रमाणे नवीन घर घेतल्यानंतर किंवा बांधल्यानंतर ‘वास्तुशांती’ करावी लागते. जी हजारो वर्षांपासून चालत आलेली एक प्रचलित प्रथा आहे. ही ‘वास्तुशांती का करावी’ (Vastu shanti ka karavi) यामागे नेमकं कोणतं शास्त्र लपलं आहे, याविषयीची माहिती
इथे जाणून घ्या.
तुम्हांला स्वत:साठी व तुमच्या कुटुंबियांसाठी एक हक्काची तसेच सुख-समाधान-सुरक्षा व समृद्धी देणारी चौकट अपेक्षित असते. त्यासाठी तुम्ही आयुष्यभराच्या कष्टाची पुंजी खर्च करून नवीन घर बनवता. तुमचे ते कष्ट सार्थक होण्यासाठी किंवा त्या सर्व अपेक्षा पूर्ण होण्यासाठी नव्या घरात प्रवेश करताना ‘वास्तुशांती’ अवश्य करावी. ही विधी दोष मिटवून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी केली जाते. तुमच्या नवीन घराशी संबंधित भूदोष, भूतादि व भुवनदोष वास्तुशांती केल्याने नष्ट होतात. घराचे बांधकाम करताना बरीच तोडफोड होते, कर्कश आवाजही होतो, तो काळ उग्र असतो. दरम्यान बऱ्याच जीव-जंतूंना हानी पोहोचते. हवन, पूजन, ब्राम्हणाच्या मंत्रोच्चाराने घरात व आसपासच्या परिसरात सौम्यता निर्माण होते, निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त होते. वास्तुशांती केल्याने घरातल्या विस्कटलेल्या किंवा बधिर झालेल्या अणू-रेणूवर चांगला प्रभाव पडतो. तुम्हाला मानसिक समाधान मिळते. या वैदिक विधीच्या निमित्ताने ईश्वराचे व आप्तजनांचे शुभाशीर्वाद मिळतात. घर साकार झाल्याचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण होतं.
आवश्यक घरगुती सेवांचा लाभ घेण्यासाठी नो ब्रोकर प्रोफेशनल होम सर्विसेस् सोबत संपर्क साधा
वास्तुशांती कशी करावी ?
या विधीसाठी विशिष्ट सामग्रीची आवश्यकता असते. त्यात हवन, पूजन आणि नैवेध्यासाठी लागणाऱ्या सामग्रीचा समावेश होतो. घराची स्वच्छता व सजावट या दोन्ही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे, जेणेकरून प्रसन्न वातावरणाची निर्मिती होईल. यामध्ये गोमूत्र शिंपडण्यापासून ते घराच्या दरवाज्याला तोरण बांधून रांगोळी काढण्यापर्यंतच्या कृतींचा अंतर्भाव होतो. वास्तुशांती करत असताना गणेशपूजन, हवन, कलशस्थापना, नवग्रह पूजन, वास्तुदेवता पूजन इत्यादी वैदिक प्रक्रिया केल्या जातात. तसेच, वास्तुपुरुषाची कथा वाचली जाते. शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे पंचमहाभूतांविषयी कृतज्ञता व्यक्त करत हा वास्तुशांती विधी संपन्न करावा.
संबंधित विषय :
घराची वारस नोंद कशी करावी ? मालमत्ता कर म्हणजे काय ? कार्पेट एरिया म्हणजे काय ?Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
वास्तुशांती का करावी ?
Nikita
204Views
1 Year
2023-02-15T11:30:51+00:00 2023-02-15T11:34:55+00:00Comment
1 Answers
Share