Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

वीज बिल ऑनलाइन भरणे

view 46 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
0 2023-03-15T14:00:22+00:00

तंत्रज्ञानाच्या वापराने बऱीच कामे हल्ली चुटकीसरशी पूर्ण होतात. काही वर्षांपूर्वी जी कामे वेळखाऊ होती. ती आता घरबसल्या एका क्लिकवर आटोपतात; जसे बँकेचे हप्ते व मालमत्ता कर भरणे, एखादे महत्वाचे कागदपत्र किंवा प्रवासाचे तिकिट काढणे, लाईट बिल कसे भरायचे किंवा वीज बिल ऑनलाइन भरणे अशा एक ना अनेक गोष्टींचा समावेश त्यांत होतो.

ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाल्याने साहजिकच तासनतास ऊन, वारा, पाऊस झेलत रांगेत उभं राहणं दुर्लभ झालं. पण, तुमच्या सोयीनुसार त्या ऑनलाइन सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्हांला संबंधित बाबींचे ज्ञान असायला हवे. ते अत्यावश्यक आहे.      

प्रत्येकाच्या हातात आलेल्या स्मार्ट फोनमध्ये ‘वीज बिल भरणे’ ही सोयदेखील उपलब्ध आहे. फोन पे व गूगल पे द्वारे तुम्ही ऑनलाइन बिल सहज भरू शकता. उदाहरणार्थ; फोन पे वरील इलेक्ट्रिसिटी पर्यायावर क्लिक करा. तुमच्या स्टेट इलेक्ट्रिसिटी बिलरला सिलेक्ट करून तुमचा कन्जुमर आयडी टाइप करा. नंतर तुमचं बिल व पेमेंट ऑप्शन तुम्हांला दिसेल. तुमच्या सोयीनुसार ऑप्शन निवडून बिल पे करून तुम्ही तुमची पेमेंट रिसिट मिळवू शकता. अशा रीतीने बसल्याठिकाणी ‘लाइट बिल भरणे’ आता सोपस्कर झाले आहे.

विजेची उपकरणे दुरुस्त करण्यासाठी नो ब्रोकर प्रोफेशनल इलेक्ट्रिशियन सर्विसशी आजच संपर्क साधा

महावितरणचे लाइट बिल कसे भरायचे ?

महावितरण बिल भरणे यासाठी खाली दिलेल्या पायऱ्यांची पुष्टी करा,

  • महावितरणचे ऑनलाइन पद्धतीने इलेक्ट्रिसिटी बिल भरण्यासाठी महावितरण एप इंस्टॉल करून घ्या.

     

  • प्रथमच वापरत असल्यास तुम्हांला आधी रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल.

     

  • रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक माहिती विचारली जाते. जसे बारा अंकी कन्जुमर नंबर तिथे टाइप करावे, जे लाइट बिलवर नमूद असते.

     

  • पुढे मोबाइल नंबर, ईमेल आयडी सोबत लॉगइन नेम व पासवर्ड सेट करावे.

  • ती माहिती सबमिट केल्यानंतर तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर तुम्ही लॉगिन नेम व पासवर्ड टाकून बसल्याठिकाणी महावितरण एपच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

  • तुमच्या सोयीनुसार पेमेंट ऑप्शन क्लिक करून तुम्ही लाइट बिल भरू शकता.

  • याशिवाय, बिल पेमेंट हिस्ट्री पाहू शकता. तक्रार दाखल करू शकता. 

संबंधित विषय :

नवीन गॅस कनेक्शन कागदपत्रे पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे  होम लोन साठी लागणारी कागदपत्रे 

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners