Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

सिबिल स्कोर म्हणजे काय ?

view 881 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
0 2023-03-15T13:58:00+00:00

सिबिल स्कोरला क्रेडिट स्कोर असेसुद्धा म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीला अथवा संस्थेला कर्ज देताना बँका व इतर वित्तीय संस्था त्यांचा सिबिल स्कोर तपासतात. संबंधित कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांची आर्थिक विश्वासार्हता पटल्यानंतर कर्ज मंजूर होते. यासाठी सिबिल स्कोर कशाच्या आधारे ठरवले जाते किंवा सिबिल स्कोर म्हणजे काय (Cibil score mhanje kay), याविषयी सविस्तर जाणून घेणे अधिक मदतीचे ठरेल.                        

‘सिबिल म्हणजे काय’ (cibil meaning in marathi) याचा अर्थ आधी जाणून घेऊयात. सिबिल (CIBIL) म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो इंडिया लिमिटेड होय. सन २००० साली स्थापित झालेल्या या संस्थेकडे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या व कंपन्यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची नोंदणी असते. त्यासाठी या संस्थेत अनुक्रमे कन्जुमर ब्यूरो व कमर्शियल ब्यूरो कार्यरत असतात.  

तुम्हांला होम लोन घ्यायचं असेल तर नो ब्रोकर प्रोफेशनल होम लोन एक्स्पर्टशी नक्की कॉन्टॅक्ट करा 

सिबिल स्कोर हा एखाद्या व्यक्तिची किंवा कंपनीची क्रेडिट हिस्ट्री दाखवणारा तीन अंकी क्रमांक असतो. या क्रमांकाची आयडियल रेंज साधारण ३०० ते ८५० च्या दरम्यान असते. जो तुमच्या क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्टच्या आधारे सिबिलद्वारे प्रमाणित करण्यात येतो. हा रिपोर्ट बँक अथवा संबंधित आर्थिक संस्थेकडून सिबिलकडे पोहोचवला जातो. सिबिल स्कोर (cibil score in marathi)ठरवताना तुमचा क्रेडिट कार्ड बिल भरण्याचा इतिहास, सध्या तुम्हांला बँकेचे द्यावयाचे कर्ज, त्या कर्जाची मुदत व परतफेडीचे रेकॉर्डस, इतर ठिकाणी नवीन कर्ज घेण्यासाठी केलेले अर्ज इत्यादी सर्व बाबी लक्षात घेतल्या जातात. सिबिल स्कोर ७५० इतका असेल तर त्या रेकॉर्डच्या आधारे तुम्हांला कर्ज सहज उपलब्ध होऊ शकते. पण जर त्यापेक्षा कमी म्हणजे ३०० च्या आसपास असेल तर अडचणी निर्माण होण्याच्या शक्यता असतात.   

सिबिल स्कोर कसा वाढवायचा ?

  • कमी कालावधीत जास्त ठिकाणी कर्ज घेऊ नका. 

  • घेतलेल्या कर्जाचे हप्ते तटवू नका.

     
  • क्रेडिट कार्डचा जास्त वापर टाळा व त्याचे बिल वेळेवर भरा. 

  • एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्डचा शक्यतो वापर करू नका. 

  • स्कोर रिपोर्ट खालावेल असे कृत्य टाळावेत. 

या गोष्टी फॉलो केल्याने तुमचा सिबिल स्कोर वाढेल. एकंदर बँकेसमोर तुमची प्रतिमा अधिक चांगली बनेल. 

संबंधित विषय :

होम लोन साठी लागणारी कागदपत्रे  मालमत्ता कर म्हणजे काय ?
Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners