Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

NA प्लॉट म्हणजे काय?

view 8273 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
0 2023-03-31T09:58:54+00:00

जमिनी खरेदी-विक्रीच्या व्यवहारात बऱ्याच गोष्टींची बारकाईने पूर्तता करावी लागते. सगळ्या बाबी कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण करून घेतल्या; तरच पुढे जाऊन कही प्रॉब्लेम येणार नाही. जागेचे दर सध्या कडाडलेत, हे तर तुम्हां सर्वांना ज्ञात आहेच. जागेचे NA करून घेणे, ते किती महत्वाचे असते किंवा NA प्लॉटस् च्या जाहिराती यांबद्दल तुम्ही ऐकून-वाचून असाल तर हे ‘na प्लॉट म्हणजे काय’ याच्याविषयी इथे अधिक जाणून घेऊया.  

मालमत्तेसंबंधी व्यवहारासाठी नोब्रोकर प्रोफेशनल प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्विसेस् सोबत नक्की संपर्क साधा

NA प्लॉट म्हणजे Non Agricultural प्लॉट होय, ज्याला मराठीत अकृषिक जमीन किंवा बिनशेती, बिगरशेती जमीन असे म्हटले जाते. जमीन महसूल संहितेनुसार १९६६ च्या ४२ व्या कलमांतर्गत कृषि जमीन बिगरशेतीच्या व्यवसायांसाठी वापरण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे अधिकृतरित्या संबंधित शेतजमीन विक्री करताना बिगरशेतीची करून घेणे अपरिहार्य असते. कारण, शेतजमीन खरेदी-विक्री कायद्यानुसार तुम्ही प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीची विक्री करू शकत नाही. आणि, जर तुम्हांला गुंठेवारी करायची असेल, प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेत जमीन शेती न करणाऱ्या व्यक्तीला रहिवासी, औद्योगिक, वाणिज्य या कारणांकरीता विकायची असेल तर त्या शेतजमिनीचे नॉन एग्रिकल्चरल जमिनीत रूपांतर करून प्लॉटस् पाडले जातात. त्यानंतर NA प्लॉट विकणे आहे, अशा जाहिराती दिल्या जातात.

NA करून घेण्याचे प्रकार पडतात; ते म्हणजे जर त्या जागेवर बांधकाम करून राहायचे असल्यास रहिवासी NA, जर त्या जागी कारखाना उभा करायचा असेल तर इंडस्ट्रियल NA त्यानंतर तिथे शॉपिंग मॉल, हॉटेल उभे करायचे असतील तर कमर्शियल NA साठी तुम्हांला जिल्हाधिकारी, नगरपालिका, तहसील कार्यालयात अर्ज द्यावा लागेल; सोबत काही कागदपत्रे जोडावी लागतात.

NA करून घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे,

  • जमिनीचा फेरफार नमुना

  •  

    बॉन्ड पेपर  

  •  

    जमिनीचा ७/१२ उतारा

  • सर्वे नंबर

  • जमिनीचा नकाशा

  • बांधकाम आराखडा (आवश्यक असल्यास)

यावरून तुम्हांला NA प्लॉट म्हणजे काय, NA कसे करून घेता येते, याविषयी पुरेशी माहिती अवगत झाली असावी.       

याच्याशी संबंधित विषय :

जमीन खरेदी-विक्री नियम जमीन मोजणी कशी करावी ?

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners