भारत शासनाच्या स्वामित्व योजना अंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्याचे आदेश काढले गेले. देशातील अनेक राज्यांतील बहुतेक शहरांत याची अंमलबजावणी होत आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड या कार्डांवर जसा एक युनिक क्रमांक असतो, जी फक्त त्या संबंधित व्यक्तीची ओळख असते. त्याचप्रमाणे एखाद्या मालमत्तेला स्वतंत्र नोंदणी क्रमांक देणारे पत्रक प्रॉपर्टी कार्ड म्हणून ओळखले जाते. तर property card in marathi मध्ये माहिती बघूया.
तुमच्या प्रॉपर्टी व्यवहाराच्या कायदेशीर कामांत नोब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसेस् ची अवश्य भेट घ्यामालमत्ता पत्रक म्हणजे काय ?
प्रॉपर्टी कार्डला मिळकत पत्रिका किंवा मालमत्ता पत्रक असे म्हणतात. जसे शेत-जमिनीच्या मालकी अधिकाराविषयीच्या नोंदी सातबारा उताऱ्यात नमूद असतात त्याचप्रमाणे बिगर शेत-जमिनीवरील मालमत्तेची नोंदणी, त्यावरील अधिकाराचे तपशील सांगणारे पत्रक म्हणजे ‘मालमत्ता पत्रक’ होय.
या कार्डवर अकृषिक क्षेत्रातील बंगला, ऑफिस, फ्लॅट अशा स्थावर मालमत्तेचे मालकी हक्क, मूल्य, टाइटल, जागेचे क्षेत्रफळ, नोंदणी क्रमांक, कर्ज घेतल्याची माहिती, जमिनीवरील भागीदारी व ती संपत्ति कुणाच्या हस्तांतरित करण्यात आली अशी सर्व माहिती नमूद केलेली असते.
‘प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय’ या प्रश्नाचं उत्तर आहे की हे एक असं अधिकृत पत्रक आहे ज्यामुळे तुमच्या मालमत्तेला एक वैध क्रमांक प्राप्त होतो. हे पत्रक कायदेशीररित्या मान्य असून तुम्ही प्रसंगी प्रॉपर्टी आयडेंटिटी म्हणून प्रस्तुत करू शकता.
ऑनलाइन मालमत्ता पत्रक पाहणे :
सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या bhulekh.mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करा. तिथे विभागाची निवड करा.
स्क्रीनवर दिसत असलेल्या ७/१२, ८ अ आणि मालमत्ता पत्रक यांपैकी मालमत्ता पत्रक या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, सीटीएन/न.भू.क्र. नंबर व्यवस्थित भरून मोबाइल नंबर टाइप करा. कॅपचा कोड टाका.
मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी वेरीफाय ऑप्शनवर क्लिक केल्यावर पडताळणी होते व तुम्हांला स्क्रीनवर तुमचा प्रॉपर्टी कार्ड संबंधित तपशीलासह दिसेल.
प्रॉपर्टी कार्डच्या कल्पनेमुळे मालमत्तेच्या बाबतीत होणाऱ्या अवैध व्यवहारांना आळा बसेल कारण या कार्डमुळे प्रत्येक प्रॉपर्टीला स्वतंत्र रजिस्टर नंबर प्रमाणित होते.
या माहितीच्या आधारे तुमच्या लक्षात आलं असेल की malmatta patrak mhanje kay, याचे महत्व काय असते हे सुद्धा समजले असावे.
याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :
खरेदी खत रद्द करण्याचा अधिकार कोणाला असतो मालमत्ता हस्तांतरण कायदा जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचाYour Feedback Matters! How was this Answer?
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
Related Questions
Most Viewed Questions
Recently Published Questions
Authors Of The Question
0 Total Answers
मालमत्ता पत्रक म्हणजे काय?
Abhilash Z
4971 Views
1 Answers
1 Year
2023-04-18T18:01:34+00:00 2023-06-16T16:07:19+00:00Comment
Share