मालमत्ता कर म्हणजे असा करप्रकार जो एखाद्या संस्थेच्या किंवा व्यक्तिच्या मालकी हक्कात असलेल्या मालमत्तेवर लावला जातो. ती मालमत्ता स्पर्श करण्याजोगी असावी अर्थात टॅन्जेबल असावी. यालाच प्रॉपर्टी टॅक्स तसेच घरफाळा असे म्हटले जाते. ते टॅक्स वेळेवर भरणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून त्यात त्याचे हित असते. तर, ‘मालमत्ता कर म्हणजे काय’ हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आता त्याविषयी आणखी सविस्तर जाणून घेऊया.
घर, फ्लॅट, संस्था, सोसायटी इत्यादींचा अंतर्भाव स्पर्श करता येण्यासारख्या (टॅन्जेबल) मालमत्तेत होतो. अशा मालमत्तेची खरेदी किंवा विक्री केल्यानंतर स्थानिक नगरपालिकेच्या संस्थेत त्या व्यवहारांची नोंद करावी. तुमच्या मालमत्तेवरील तुमचे मालकी हक्क अबाधित ठेवण्यासाठी विशिष्ट रक्कम म्हणजे मालमत्तेवरील कर तुम्हांला भरावे लागते. ठराविक कालावधीनुसार ते कर महानगरपालिकेत जमा करावे. जेणेकरून भविष्यात जर मालमत्तेच्या अधिकारावरून विवाद उद्भवला तर तुम्ही सुरक्षित असता. मालमत्ता नोंदणी व मालमत्ता कराचे अधिकृत पुरावे सादर करून त्या मालमत्तेवरील तुमचे अधिकृत हक्क तुम्ही सिद्ध करू शकता. तसेच, तुम्ही भरत असलेल्या विविध मालमत्ता करांतून नगरपालिका क्षेत्रीय विकासाची कामे करते. त्यांत नागरिकांच्या सुविधेसाठी स्वच्छ परिसर, शुद्ध जल, सुरळीत रस्ते आदी नगरविकास कामाचा समावेश होतो. तर आता, ‘आपल्याला मालमत्ता कर का भरावा लागतो’ याचं उत्तर तुम्हांला मिळालं असेल.
प्रॉपर्टी संदर्भातील कायदेशीर कामांसाठी नो ब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विससोबत जरूर संपर्क कराऑनलाइन मालमत्ता कराची गणना कशी करावी ?
मालमत्ता कराची गणना करण्यासाठी एका विशिष्ट सुत्राचा वापर केला जातो. ज्यात मूळ किंमत, वय व लिंग, इमारतीचा प्रकार, वापर श्रेणी, अंगभूत क्षेत्र यांचा समावेश होतो. अर्थात, महानगरपालिकेने तुमच्या भागांत पुरवलेल्या सुविधा, तुमचे मालमत्तेचे आकार व स्थान, मालकाचे वय व लिंग (ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी सवलत असू शकते.) या गोष्टी विचारात घेतल्या जातात. अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमची प्रॉपर्टी आयडी, कॉन्टॅक्ट डिटेल्स, पेमेंट मोड मेन्शन करा. ऑफलाइन व ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने तुम्ही मालमत्ता कर भरू शकता.
संबंधित विषय :
घरपट्टी नावावर करणे अर्ज भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे काय ?Your Feedback Matters! How was this Answer?
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & DeliveryIntercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
मालमत्ता कर म्हणजे काय ?
Bhave M
1694 Views
1 Answers
1 Year
2023-02-16T12:24:09+00:00 2023-02-21T18:31:03+00:00Comment
Share