Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

मुद्रांक शुल्क म्हणजे काय?

view 2491 Views

1 Answers

1 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
0 2023-03-31T10:12:11+00:00

मालमत्ता व्यवहार असो वा कोणतीही कायदेशीर प्रक्रिया, तिथे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) हा शब्द सर्रास ऐकण्यात येतो. तर, या स्टॅम्प ड्युटीची गरज काय, कशासाठी हे शुल्क घेतले जाते, कुणाकडून आकारले जाते; शिवाय मुद्रांक शुल्क म्हणजे काय (

stamp duty meaning in marathi

), स्टॅम्पला इतके महत्व का आहे, ही सगळी माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

स्टॅम्प ड्युटी अर्थात मुद्रांक शुल्क हा एक टॅक्सचा प्रकार आहे, ज्याला सरकारी फी असेही म्हणतात; जो मालमत्ता संबंधी विविध खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर लावला जातो. हा शुल्क राज्य सरकारतर्फे आकारला जातो, जे प्रत्येक राज्यांत वेगवेगळे असू शकते. मुद्रांक शुल्क हे राज्य शासनासाठी प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत असून ते नेहमी मालमत्ता विकत घेणाऱ्याला भरावे लागते. हे शुल्क भरणे अनिवार्य असून याने तुम्ही खरेदी करत असलेल्या प्रॉपर्टीवर तुमचे मालकी हक्क अधिकृतरित्या हस्तांतरित होते. पुढे त्या प्रॉपर्टीच्या मालकी अधिकारासंदर्भात वाद उद्भवल्यास, तुम्ही तुमचा हक्क विनाअडचण सिद्ध करू शकता.  

प्रॉपर्टी व्यवहारातील कायदेशीर प्रक्रिया जाणण्यासाठी नो ब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसला भेट द्या 

 

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ (स्टॅम्प एक्ट) कलम ६९ मधील पोट-कलम ‘२’ चा खंड ‘ग’ व पोट-कलम ‘३’ च्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्काचा ई-भरणा आणि परतावा नियम, २०१३’ अमलात आणला. संबंधित प्राधिकृत बँकेमध्ये ऑनलाइन मुद्रांक शुल्क भरल्यानंतर तुम्हांला ई-एसबीटीआर (ई-सुरक्षित बँक व कोषागार पावती म्हणजेच e-Secured Bank and Treasury Receipt) प्राप्त होते.

स्टॅम्प ड्युटी कॅल्कुलेटर (मुद्रांक शुल्क परिगणक)

महाराष्ट्र सरकारच्या

https

://

igrmaharashtra.gov.in

/

या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तिथे नोंदणी व मुद्रांक विभाग या पेजच्या उजव्या बाजूला तुम्हांला स्टॅम्प ड्युटी कॅल्कुलेटर (मुद्रांक शुल्क परिगणक) हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून सेल डीड या बॉक्सवर जाऊन तुमचे जे क्षेत्र असेल ते निवडा जसे महानगरपालिका, नगरपरिषद, छावणी क्षेत्र, ग्रामपंचायत यांपैकी. त्यानंतर विक्रेता व खरेदीदार यांच्यात मालमत्तेची ठरलेली रक्कम (

Consideration value

) व त्याचे बाजार मूल्य (

Market

value

) नमूद करा. तुम्हांला एक संदेश स्क्रीनवर प्राप्त होईल, ज्यामध्ये संबंधित व्यवहारात स्थानिक करांसहित तुम्हांला भरावयाची स्टॅम्प ड्युटी प्रस्तुत केली जाईल. तर अशाप्रकारे तुम्ही

stamp duty in marathi

समजून घेतली असेल.  

संबंधित विषय येथे वाचा : महारेरा म्हणजे काय ? घर नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे काय ?

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners